STORYMIRROR

Trupti Naware

Inspirational

4  

Trupti Naware

Inspirational

पाऊस पडला हृदयात

पाऊस पडला हृदयात

1 min
315

वारा गुंतला पानात

गारवा पडला रानात

सुर्य लपला क्षणात

चाफा हसला मनात


किरणांच्या कणाकणात

थेंब विरले उन्हात

लपंडाव निळ्या घनात

कोकीळेच्या मंजूळ स्वरात


भिजलेले पंख गगनात

भिजलेल्या ओल्या गाण्यात

चिखल मातीचा गंधात

सय पेरतो पापणीत


सांज गुंतली आकाशात

मावळतीचा रंग उधळण्यात

प्राजक्त निजला अंगणात

जागर राञीचा पावसात


थेंब विसावले काही डोळ्यात

काही पसरले कवीतेत

सर गुंतली एकमेकात

प्रेम ओथंबले अतोनात


हळुवार अत्तर सुगंधात

त्याने शिपले सप्तरंगात

पाऊस पडला हृदयात

बहरल्या आठवणी रोमरोमात.!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational