पाऊस, ढग आणि आठवणी
पाऊस, ढग आणि आठवणी
पावसा पावसा येशील कधी...
वाचून तुझ्या जीवना ना संधी..
ढग येतात दाटून आकाशात..
आनंद भरभरून येतो जीवनात..
आठवणी पाऊसाचा येता ध्यानात..
अस्सल मजा असते हो पावसात खेळण्यात..
मस्त खावे गरमागरम भजे..
सवे त्याच्या कांदा साजे..
साथ मिळता भज्याला कढीची ..
गरज नाही मग कोणत्या पक्वान्नाची..
ढगाची नक्षी निरखण्यात वेळ कसा निघून जातो..
कॅमेऱ्याने दृष्य टिपण्यात मनाला आनंद मिळतो..
निसर्ग, पशु, पक्षी सारे कसे प्रफुल्लीत असतात..
आपल्या प्रसन्नतेने माणसालाही प्रफुल्लीत हो करतात..
न्यारी असते आठवण प्रत्येक पावसाची..
शीन सारा दूर करतो तहान हरतो पृथ्वीची ..
