Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

पाऊलखूणा

पाऊलखूणा

1 min
13.8K


नव्हताच ग तुला कनभर अधिकार

किती यातना भोगल्या अन घोर भर्सना

तूला केले होते एक निर्बल अबला पण

पसरलेल्या काट्यातूनी वाट काढली अन,

विश्वसागरात उमटवल्या तू पाऊलखूणा.....


नवे क्षितिज गाठण्यासाठी परीकष्ट उपसूनी

सदैव तत्परता दाखवित गेलिस

नाही काही करता आले जरी

अापल्या मुलांना तू घडवित गेली अन,

विश्वसागरात उमटवल्या तू पाऊलखूणा......

पंख छाटूनी केले तूला निपंख

बाळपणात ही केले तुला त्रस्त

परी न घाबरता कर्तूत्वासाठी

चढलीस तू बिनधास्त बोहल्यावरी अन,

विश्वसागरात उमटवल्या तू पाऊलखूणा......


संसारात करूनी साऱ्यांची सेवा

स्त्री होवूनी सु:खदु:खाची सीढी चढली

कुठे तू राणी कूठे दासी होवूनी

कूठे मर्यादा कूठे अवदसा भोगली,

स्त्री असून पुरूषाची बरोबरी केली

जगी दिली स्वयंसिद्धाची ओळख अन,

विश्वसागरात उमटवल्या तू पाऊलखूणा......

माया,ममता,वात्सल्यात वाहूनी

कधी अस्तित्वाची दिली तू बली,

पण भरोसा केला अंतरमनावर

नव्हतीच मुळी तुझी रिकामी झोळी,

दडला होता गुणांचा उरात खजिना

झाली राष्ट्रपती,विश्वसुंदरी,कलाकामिनी अन

विश्वसागरात उमटवल्या तू पाऊलखूणा......



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational