पाउल
पाउल
हे जग तुला नविन आणि ही वाटही ..
या वाटेवरच तुझं पहिलं पाउल तुला दाखवतील अशा असंख्य वाटा आणी जग ....
या वाटेवरील खाचखळगे, वळणे, आडवळणे
यांचे धोके तुला सरावाचे होईपर्यंत धरलाय हातात मी तुझा...
एकमेकांच्या साथीने प्रवास होईल सहज, सोपा
माझीही संथ चाल होईल जरा वेगाने ...
