STORYMIRROR

Umakant Kale

Children

2  

Umakant Kale

Children

पाटी

पाटी

1 min
2.4K


स्मरणातून आपल्या हरवली पाटी

एकेकाळी तिने घडवली किती कार्टी

दिसायला ती होती जरी काळी

तिच्याशिवाय नसे अभ्यासाला झळी..

 

पहिल्या दिवशी हट्ट करुन आणायचो

शाळते रोज मग आम्ही वापरायचो

कोरुन यावर शिकली बारखडी

यावर सोडवली गणिताची कोडी...

 

आठवते पाटी पुसायला होती डबी

स्पंचासोबत असे मग पाण्याची डबी

या पाटीने अनेक थोर घडले

त्यांनी पुढे इतिहास रचले...

 

पाटी नाही दिसत आज मला

वाटत होता जिचा कधी हेवा..

कुणाचे होते प्रेम तर कुणाची ती साधना

कसे विसरु पाटी ला कोणी तरी सांग ना ?

 

आधुनिकीकरणाने तिचा गेला जिव

आता ति स्वप्नात ही येईना...

बाबा मले पण हवी आता पाटी

असे म्हणायचे दिवस उरले पुस्तकाच्या काटी..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children