STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational Children

3  

Bharati Sawant

Inspirational Children

पतंग

पतंग

1 min
276

नानाविध आकारांचा

दिसतोय नभात पतंग

डोलतो वाऱ्यावर स्वैर

उठतात मनातून तरंग


किती रंग अन् प्रकार

मांजा असतो लांबसर

आकाशी लागे स्पर्धा

काटे कोणी मांजादोर


शेपटी दिसे शोभिवंत

उडताना वाटतेय मजा

नका बनवू काचेचे दोर

ठरेल पक्ष्यांसाठी सजा


अडकतील मृदु पंखही

मांजात त्या पाखरांचे

जीवच गमावून बसती

वेदनेने त्या बिचाऱ्यांचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational