STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Children

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Children

आईची महती

आईची महती

1 min
266

एके दिवशी सकाळी

आई उठलीच नाही

अंथरुणातच कण्हत

तापाने झोपून राहिली


अंगण झाडलोट नाही 

सडा नि रांगोळी नाही

घरभर पडला पसारा

स्वच्छता कुठेही नाही


सकाळचा चहा कोण करणार

स्वयंपाक कोण करणार

धुणी भांडीचा प्रश्न होताच

सारे काम कोण करणार


मनात खूप सारे प्रश्न होते

त्याचे उत्तर मात्र आईच होती

एक दिवस आजारी पडल्याने

साऱ्यांना कळाली आईची महती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children