STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Children

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Children

राजभाषा मराठी

राजभाषा मराठी

1 min
216

मायमराठी भाषा तुझ्यापुढे मी नतमस्तक आहे 

तुझे भव्य दालन पाहून मी भारावून गेलो आहे 

मायभूमी आणि मायभाषा हे नातेच आहे अतूट 

मायमराठी राजभाषा होण्यास व्हारे एकजूट 


संतांचा तू आधार आहे, महापुरूषांची गाथा आहे 

जनसामान्यांची माता तू, त्यांची ललाट रेषा आहे 

तुझ्याच शब्दांनी क्रांतिवीर इथे भाग्यवीर ठरले 

तुझ्याच अस्तित्वासाठी त्यांचे बलिदान इथे झाले 


भाग्य तुझे किती थोर आहे, तू सातासमुद्रापार आहे 

जगभरातील परभाषियाना आपलेसे तू केले आहे 

त्यांच्यात आनंद देण्याची तू किमया किती केली 

तुझ्या शब्दांच्या गाण्यांनी महाराष्ट्रभुमी पावन झाली 


शब्दकोष तू विश्वकोष तू सृजनशीलता जननी आहे 

जगातली तू एकमेव तू संशोधनाचा इतिहास आहे 

तुझे गीत गाताना रक्त सळसळते कायम शाहिरांचे 

तुझ्या शब्दांच्या लेखणीने, प्रबोधन होते महाराष्ट्राचे 


तुझे शब्द म्हणजे जगातली धारधार तलवार आहे 

तुझ्या शब्दांने घाव घालणारी रणरागिनी आहे

तुझ्याच अस्तित्वाने घडले इथे महान किर्तीवंत 

ज्ञानपीठाची माय तू व्यासपीठ तुझे बालमनात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational