STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Children

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Children

विज्ञान

विज्ञान

1 min
295

  विज्ञान आहे तरूण पिढीचा नित्य भावी आधार 

  आता नका ठेवू विश्वास बुवाबाजी अंधश्रद्धेवर  


   सर्व जीव सृष्टीचा जीव,जगण्यातला श्वास आहे 

   सार्या पृथ्वीचे विणलेले,विस्तारलेले मोठे जाळे आहे


  विज्ञानाने आता सर्व जग जवळ आणले आहे 

  खरे,खोटे काय आहे ते सांगितले आहे


  विज्ञान उद्याचे भविष्य आणि वाटचाल आहे खरी 

  उद्योन्मुख जगाचे परिवर्तन करणारे खरे शस्रधारी 

  

  विज्ञानाने संशोधन केले सार्या जीवसृष्टीवर 

  पृथ्वी,अंतराळ आणि साऱ्या ग्रहावर,उपग्रहावर 


  जगाला मिळाले अनेक उपग्रहांकडून नवीन शोध 

  आता जगाला लागले आहे नवीन ग्रहांचे वेध 


  या ग्रहांच्या आधारावर तरले आहे सारे जग 

  दररोज घडणार्या घटनांचे क्षणात घेतात वेग 


  जगातील शास्रज्ञानी आपले आयुष्य सेवेस दिले 

  त्यामुळेच जग खरे प्रगतीच्या दिशेने वळले

  


  तेच आहे या जगाचे,पृथ्वी अभ्यासाचे जनक महान

  नवीन पिढीचे तेच खरे निर्माते आणि जीवन वरदान 

 

  विज्ञान हे सत्यच बोलते,सत्यच सर्वकाही करते 

  नवनवीन आव्हाने स्विकारून निष्कर्षास पात्र ठरते 

 

  तरूण पिढीचा विज्ञान तिसरा डोळा खरेच आहे 

  त्याच्या शिवाय सारे जग अंधकारमय आहे 

  

   विज्ञान जगाला शांतीचा संदेश पोहचवेल

   जगाशी अतूट मैत्री जोडून विनाशकाळ टाळेल 

   

    विज्ञानाने जग केले सुखी,समृद्ध समाधानी 

    त्याचा उपयोग करा मानवाच्या भल्यातूनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational