माझं जग
माझं जग
रोजच्या या जगण्याची
सवय मला झालीय
माझ्या या छोट्याश्या जगात
एक परी पाहुनी आली
लागली ती दुड्डदुड्ड धावू
सारे घरच तिच्या मागे
फिरू लागले
सर्वांना एकत्र बांधण्यात
ती झाली यशस्वी
पाहण्यात आम्ही झालो दंग
तिच्या इवल्याश्या हालचाली
मनस्वी वाटे हर्ष
पाहुनी त्या बाहुलीला
माझे जग केले
तिने आशेने जागे
भावनांचे बंध विणले
या नाजूक नात्याने
माझे जीवन धन्य झाले
लेकीच्या येण्याने,
लेकीच्या येण्याने...
