STORYMIRROR

Prashant Shinde

Children

3  

Prashant Shinde

Children

मारुती राया शनिवार उगवला उठा....!

मारुती राया शनिवार उगवला उठा....!

1 min
257

मारुती राया शनिवार उगवला उठा....!

अरे उठा उठा

कानावर हाक आली

आणि मी

पुन्हा मुस्कट मारली

वाटलं काय हा ताप

सकाळी सकाळी

आईची हाक सुद्धा

आज नकोशी वाटली

म्हंटल

ग्रहण लागू दे शाळेला

नुसती कट कट

म्हणे उठा पट पट

आवरा झट झट

आणि जा शाळेत पटकन

प्रश्न पडला मनास

आम्ही घरात नको वाटतो का यांना..?

इतकी अडचण होते का....?

कळण्या आधीच

शाळा गाठली होती

बाईंनी हजेरी उघडली

आणि माझे नाव पुकारले

मी हजर म्हणून ओरडलो

आणि

पहातो तर काय

गरम गरम पाणी

अभिषेकासाठी डोक्यावर पडत होत

आणि आईच रोजच

पुराण पठण होत होतं

तुझं आवरण्यात जन्म जातो...!

अक्कल कधी येणार देव जाणे...!

आटप आणि जा एकदा शाळेत...!

म्हणजे सुटले...!

शनिवार असल्याची खात्री झाली

आणि

मारुती राया मी शाळा गाठली....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children