पारखावे जरा
पारखावे जरा
भेटता माणसे पारखावे जरा
न्याहळावे तिथे बारकावे जरा।।१।।
खोल गेले किती नीर भूमीतले।
काटकसरीत ते वापरावे जरा।।२।।
चांदव्या सारखा हा तुझा चेहरा।
झाकला, केस हे आवरावे जरा।।३।।
यातना, वेदना नेहमी ऐकतो।
प्रेम संगीत मज ऐकवावे जरा।।४।।
साहिला जीवनी क्रोध माझा किती।
प्रेम माझे सखे पांघरावे जरा।।५।।
अर्पिला देह हा मी तुला ईश्वरा।
जीवनी तू मला सावरावे जरा।।६।।
यौवनाचा जरी भार झाला तुला।
आज बाहूत या शांत व्हावे जरा।।७।।
