पानगळ
पानगळ
ऋतुपर्ण आहे जीवन जणू
होता क्षीण समय जातो सरून
जीर्ण होते जीवनही मग
स्मृतीस उधान भलतेच येई
विरक्ती असे जणू ही निसर्गाची ही
ॠतुपर्ण होते जीवनी जणूकाही
श्रावण च्या यौवनास बिलगून
राहणं कुणाला आवडत नाही ?
सरतो काळ चिंब भिजल्या मनाला
लागतो गारवा गुलाबी थंडी चा
होतसे धुंद वेडं मनीचं वेली च ती
निसर्ग ही होतो खुळा प्रियापाहुनी
धुंद असताना च कुठुनशी रुक्षता
श्वासात जाणवते ते रखरखित ऊन
सरला हिवाळाही निसर्ग सांगत असे
शिशिर ॠतू संक्रमित होतसे हा
पानगळ होतसे सभोवताली
जीवन गळून पडली जणू खाली
करपून जाते कोवळी पहाट ही
होतो शिशिर चा विजय अंगणी
क्षणात सगळे पांगल्या प्रीती चांदण्या
शिरशिरी रात्री ची भिती मनी विरहाची
आसवे ही सुकून जाती चढे ज्वर सूर्यासही
गळुनी पडली प्रीती ही होतसे पानगळ जीवनी..🍁
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍁
✍.....🍁🍂
