STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational Others

3  

Pandit Warade

Inspirational Others

पानगळ

पानगळ

1 min
775

ऊन पाऊस सोसला

पांथस्थाला दिली छाया

नित्य देह झिजवला 

दिली लेकराला माया


किती ऋतू आले गेले

तमा नाही कधी केली

ताठ उभा राहुनिया

किती सांभाळल्या वेली


जेव्हा फुलला फळलो

गर्दी पाखरांची झाली

झाली पानगळ आता

पिलं आकाशी उडाली


गेले सारेच सोडून

उभा एकटा उन्हात

नाही संगतीला कुणी

अशा निर्जन वनात


गेली सारी हिरवळ  

झाली आता पानगळ

आयुष्याची सांजवेळ

आली वाटते जवळ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational