STORYMIRROR

Pandit Warade

Classics

3  

Pandit Warade

Classics

पांडुरंगा

पांडुरंगा

1 min
14.1K


डोळे मिटून कुठवर बसणार पांडुरंगा।

केव्हा तुझ्या मुलांना बघणार पांडुरंगा।।


जो भाबड्या मनाने वारीस नित्य येतो।

त्याचे नशीब केव्हा फळणार पांडुरंगा।।


मातीत फेकले बी केवळ तुझा भरोसा।

विश्वास सार्थ केव्हा ठरणार पांडुरंगा।।


पाहून वाट थकले हे नेत्र पावसाची।

पाऊस सांग केव्हा पडणार पांडुरंगा।।


प्रत्येक स्त्री जनाई बनुनी तुलाच भजते।

दुःखे कधी तिचे तू दळणार पांडुरंगा।।


'नारी न भोगदासी, पुजनीय मान तिजला'।

केव्हा नराधमांना वदणार पांडुरंगा।।


दारात भक्त आले वीटेवरी उभा तू।

भक्तांस भेट केव्हा घडणार पांडुरंगा।।


मी वीट पायरीची व्हावे, मनात आले।

माझाच 'मी'पणा मज नडणार पांडुरंगा।।


आहे जसा तसा घे पदरात पंडिताला।

अंतीम ही मनीषा असणार पांडुरंगा।।




Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics