पांडुरंगा..
पांडुरंगा..
हे असं अजून किती दिवस चालणार
पांडुरंगा.. तू लक्ष देतोयस ना रे बाबा..
आषाढी गेली कार्तिकी गेली तरी वारी नाही झाली
तुझ्या भक्तांवर तू लक्ष देतोयस ना..?
मान्य आहे तू मंदिरात नव्हतास..
तू तर नाक्या नाक्यावर अन् हॉस्पिटलमध्ये होतास
तरीही तुझा भक्त नाम्याच्या पायरीवर बसला होता
पांडूरंगा..तू लक्ष देतोयस ना रे बाबा..
तुझा भक्त भलेही अडाणी आहे रे..
पण वारीतून जगाला ज्ञान शिकवतोच आहे ना
सगळंच बंद झालं तर कसं चालेल रे हे जग
पांडूरंगा.. तू लक्ष देतोयस ना रे बाबा..
तू कडी कुलूपात राहूनही कसा शांत आहेस रे
बाहेर बघ ना रे जरा....
तुझा भक्त तुझ्या भेटीसाठी तळमळतो आहे
पांडूरंगा.. तू लक्ष देतोयस ना रे बाबा..
संपवून टाक रे हा कोरोनारूपी राक्षस
पुन्हा चालू कर ना रे ही तुझी जग रहाटी
अन् कड्या खांद्यावर घे ना रे तुझ्या भक्तांना
पांडूरंगा.. तू लक्ष देतोयस ना रे बाबा..
