ऑनलाइन शाळा
ऑनलाइन शाळा
प्रत्यक्षातल्या शाळेची सहल
ऑनलाइन अभ्यासात नाही
हसऱ्या चेहर्याच्या बाई दिसतच नाही
शेजारच्या बाकावर च्या मैत्रीची गोडी
घराच्या कानाकोपऱ्यात नाही
क्लास चालू होता त्याची आठवण येई
सकाळची पहाट अशीच वाया जाई
शाळेतला परिपाठ आठवतो घाई
राष्ट्रगीत सुरू होताच ताठ होती माना
शेवटी भारत मातेची घोषणा
देशभक्तीचे वेड लावते ती शाळा
तास चालू होताच शांत बसायचे
ऑनलाइन तासात मन लागत नाही
रागवलेल्या बाईंचा चेहरा दिसत नाही
परीक्षांची भीती उरलीच नाही
फक्त मुले शरीरानेच मोठे होई
ब्रेक झाल्यावर खायचं डब्बा
वाटणी करून खायची वेगळीच मज्जा
घरच्या ब्रेकमध्ये नाही ती मज्जा
शाळा बंद होऊन मिळते सजा
