रंगांची वारी...
रंगांची वारी...
रंगांची वारी आज
निघाली खेळायला
बालचमू संगे आली
धुळवडीत रंग भरायला...
लाल, पिवळा, निळा रंग
सारे ताटात छान सजले
आईच्या हाती ताट पाहिले
ओवाळायला पाटावर सारे बसले...
बाबा, आजोबांना लावला
आईने भाळी रंगीत टिळा
बाबांनी हातात घेतला
रंग छानदार आकाशी निळा...
बाबांनी लावला आईला रंग
आजोबांनी लावला आजीला रंग
बालचमू विखुरली धुळवडीत
झाली ती रंग खेळण्यात दंग...
खेळून खेळून सारी दमली
आपापल्या घरी निघाली
घरी जावून आंघोळ केली
रंगांची मजा सर्वांनीच लुटली...
रंग होते निसर्गातील फुलांचे
नाही त्रास झाला याने कोणाला
कृत्रिम रंग नकोतच बाबा रे
नैसर्गिक रंगांमुळे मजा आली खेळाला...