ऑनलाईन शिक्षण
ऑनलाईन शिक्षण


एक काळ होता
पाटी, पुस्तकं, दप्तर
बहू हे ज्ञानार्जनाकरता
नवयुग आले
तंत्रज्ञानाचे अवघे
कलियुगी परीस लाभले
सान थोरांना हे
समान धरी अभ्यासा
आकांक्षेने मार्गक्रम आहे
आव्हाने कठीण
शिक्षण साधनेला हे
विषाणूने केली दाणादाण
खेळ रंगे हाचि
एक सान एक थोर
शिक्षा थोरांना हो शिकण्याची
ना ताळ ना मेळ
मुका चलचित्रपट
चाले असंपर्कच्या वेळा
टळेल संकट
होई पूर्वपदावर
जपा माणुसकी व्हा एकजूट