ओंजळीचे झाले मणभर..
ओंजळीचे झाले मणभर..
तुझी लीला तुच जाणे भगवान...
पामर मनुष्याला तुच बनवी महान...
अरे मानवा,हा ओंजळीचा खेळ ...
भगवान तुझ्या संग कसे खेळे
तुला हि न कळे....
ओंजळभर दुःखाला...
मणभरा चे सुख...
हे भगवंतच करत असे..
ओंजळभर मेहनतीला
मणभरा चे फळ...
हे भगवंतच देत असे..
ओंजळभर भक्तीला...
मणभर आशिर्वाद.
ही भगवंताचीच कृपा असे...
ओंजळभर शब्द,
मणभर कविता
हे भगवंतच सुचवत असे...
ओंजळभर द्वेषाला,
मणभर प्रेम
हे भगवंतच करवीत असे...
ओंजळभर त्याग,
मणभर समाधान...
हे भगवंतच शिकवत असे...
ओंजळभर दान,
मणभर मान...
हे भगवंतच करून घेत असे...
ओंजळभर पुण्य,
मणभर पाप..
हे भगवंतच माफ करत असे...
ओंजळभर संपत्ती पण,
मणभरा ची मुक्ती.
हे भगवंतच साध्य करत असे...
म्हणून, नको करू गर्व " मी" पणा चा..
ओंजळभर का होईना, कर त्याग अहंकाराचा.
