STORYMIRROR

Umakant Kale

Tragedy

3  

Umakant Kale

Tragedy

ओझे

ओझे

1 min
26K


डोक्यावर उचलून भार,हरवले बालपण

पाटी, पुस्तक ना हो नशिबी 

पोटाची खळगी, ना जगू देई  

ही अभागी खेळी माझ्या नशिबी

दोन वेळची भाकर बोले

जगण्याचे माझे धडे गिरवे

इवलसं पाऊल झगडते

मन हे आयुष्याचे गुपित सोडवे

रेखा हाताची मिटली हो आता

डोळ्यात आस ना उरली आता

लेकरांची ही व्यथा, ना दिसे कोणा

फक्त नावालाच झाला कायदा आता

शिक्षण बोले ओत पैसा आता

पैसा म्हणे मी गरीबाजवळ राहू का आता?

पैसा जिथं तिथे नाचे,बालपण मग राबे

चालले मी हा रस्ता ना माझा आता?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy