STORYMIRROR

Sunil Deokule

Inspirational

2  

Sunil Deokule

Inspirational

ओ + ve रक्तगट

ओ + ve रक्तगट

1 min
13.4K


सर्वांचं रक्त कधीच सारखं नसतं

लाल असतं म्हणूनच तसं भासतं

रक्ताचे वेगवेगळे रक्तगट असतात

ते कधीच बघा एक सारखे नसतात

एका गटाचे दुस-याला चालतच नाही

दिले तरी माणूस काही जगतच नाही

विज्ञानामुळेच अनेक रक्तगट बनले

अज्ञानाने त्याचेच पुढे गट होत गेले

गटानेच ती ओळखली जाऊ लागली

त्यालाच धर्माची लेबलं लागू लागली

हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन बौद्ध बनले

एकमेकांपासुन मग दूर होऊ लागले

वरचढ होण्याची स्पर्धा होऊ लागली

एकमेकांवर कुरघोडी होऊ लागली

धर्म नाही खरा असं आपण म्हणतो

एक धर्मियाचे रक्त आपण दुस-याला देतो

तरी ओ पाॅझीटीव्ह फक्त एक गट आहे

कोणालाही रक्त देऊन वाचवतो आहे

अभिमान आहे ओ पाॅझीटीव्ह असल्याचा

नका मानू मला मग कोणत्याही धर्माचा

प्रत्येकाने जपू चला आपल्या रक्तगटाला

मुठमाती देऊ आता जाती आणि धर्माला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational