नववधूची कांकणे
नववधूची कांकणे
प्रेमिकांच्या एकांतात
शृंगारचेष्टिते नाना
सावरता कांकणास
किणकिण येई काना
कांकणाची किणकिण
सुमधूर नादमयी
कशी होई अवचित
तिच्या नच ध्यानी मनी
नववधू लाजतसे
किणकिण कंकणांची
शब्दाविना सांगतसे
गोड गुपिते मनाची
लाभे प्रेमाचा स्वर्ग
कसा साहू प्रेमभार
नवनव्या शृंगारात
प्रिया लाजूनच चूर
भाव अंतर्मनातले
कसे सांगावे प्रियाला?
कांकणाची किणकिण
सुखविते भर्ताराला
