नवरेशाही
नवरेशाही
सगळ्या बायकांची तक्रार
मैत्रिणीचा नवरा फारच गुणी
त्रास सगळा होतो फक्त मला
कारण माझा नवरा अवगुणी
रुबाबदार देखणा सुशील
आहे शेजारणीचा नवरा
फक्त कामाला लावणारा
नवरा माझा आहे हावरा
घरातली सगळीच कामे करून
ऑफिसला जातो बहिणीचा नवरा
सकाळ-संध्याकाळ ऑर्डर सोडून
कामाला गरगर फिरवतो जणु भवरा
माझी आई बघा किती नशीबवान
बाबा जपायचे तिला फूलासमान
नवरा माझा हाका मारत राहतो
. बनवले मला जणू कागदी विमान
सासुबाई आहेत किती भाग्यशाली
सासरे देतात म्हणून सारा किरणामाल
नवरा माझा मलाच पिटाळतो जणू
बाबांनी पाठवलाय फुकटचा हमाल
