नवलाई
नवलाई
पावसाच्या धारा
गारां चा मारा
सुसाट वादळ वारा
प्रफुल्लित निसर्ग सारा
झाडावर आली हिरवाई
पाहून नयनी नवलाई
मनी आनंदाची लहरा ई
आली निसर्गाला बहरा ई
मनी वसते प्रेम रंग
निसर्ग उधळतो भांग
नशा चढली निसर्ग सौंदर्याची
दश दिशा उधळीते रंग नवतेजाची
आला तुफान वारा
कुसुमा चा वर्षाव सारा
निसर्ग सौदर्याने नटली धरा
नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर जपून करा
निसर्ग वाटे हवाहवासा
त्याचे सौंदर्य मनी भुरळ घाली कसा
वातावरण सारे चैतन्यमय जाहले
नवीन प्रेरणा घेवून आले
निसर्गाची नवलाई
उत्साहवर्धक होई
मन आकाशी झेप घेई
अशी निसर्गाची किमया जादुई
