STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

नवे गाव

नवे गाव

1 min
312

क्षितिजाच्या पलिकडे असेलच 

नक्कीच कुठेतरी आदर्श नवे गाव |

कदाचित कुणाला नसेल ठाऊक

काय असेल त्याचे ते नाव? | |१| |


स्वप्नात नेहमी येते माझ्या सुंदर

निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव |

वाटतं प्रत्यक्षात जावे ते पाहायला

घेते हृदयाचा माझ्या जे ठाव | |२| |


असेल ते नक्कीच खूप आदर्शवत 

देईल सर्वांनाच मनापासून भाव |

नसेल तेथे भेदाभेद जातीधर्मांचा

असतील सर्व समान रंक वा राव | |३| |


सर्व असतील समाधानी निरोगी

तेथे नसेल दु:ख व चिंतांना वाव |

सांगा बरं कोणाला का आवडणार

नाही असलं नयनरम्य नवे गाव? | |४| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational