नव वर्षात प्रवेश करू या
नव वर्षात प्रवेश करू या
जे जे अनिष्ट अघटीत दुःखद घडले या वर्षभरात सोडून सारे इथवर करुया प्रवेश नव वर्षात.
व्यथित झाले असेल मन कुणी दुखविले असेल चुकुन करून टाका माफ
नका ठेऊ दुस्वास मनात विसरून इथवर करुया प्रवेश नव वर्षात 1
नानापरी संकटे मानसांच्या अयुष्यात सारे जग अजूनही करोनाच्या सावटात.
काळजी घ्या ठेवा सुरक्षित स्वतासह कुटुंबास निसंकोच पणे घ्या करोनाची लस.
नका करू दिरंगाई नियम पाळण्यात.निश्चिंतपणे प्रवेश करा नव्या वर्षात
नवी पहाट नव्या क्षितिजावरची नवी झळाळी विसरून सारी दुःखाची गाणी
छेडील नवा आलाप शिकवून जाईल आयुष्याला नवा दृष्टीकोन नवा आयाम
नव्या दमाने रमू या नव्या स्वप्नात निश्चिंतपणे प्रवेश करा नव्या वर्षात.
सरत रहातील अशीच वर्षानुवर्ष वयाच्या बेरजा वाढत रहातील शिष्टपणा सोडलात
तर जिवंतपणीच माणसं आपली रहातील संवाद हरवत चाललाय रस्ता तिथंच आहे
माणूस पुढं चाललाय थोडं त्या वळणावरही पहा.नका जगू भ्रमात
तरीही शुभेच्छा सदैव रहातील करा प्रवेश आनंदाने नव्या वर्षात
