नऊ दिवस नऊ रात्र
नऊ दिवस नऊ रात्र
आश्विन मासी शुक्ल पक्षी एकम ही तिथी,
घट देवीचे स्थापना होई ह्या शुभ दिनी..
नऊ दिवस करू आई ची सेवा आणि पुजा विधी,
जितकी नावे तितकीच आईची आहे महती..
अनेक ठिकाणी,अनेक रूपात आईला पुजती.
आई अंबे चा क्रोध पाहूनी, दानव ही त्यांस भिती,
महिशासुरा मारूनी, मुक्त केले सर्वां त्रासातूनी.
नवरात्रीत आई फिरते स्वतः ह्या पृथ्वीलोकी...
नऊ दिवस नऊ रात्री,अंबे मातेचा जप असावा मुखी..
नऊ रंगाचे विशेष महत्त्व ह्या नऊ दिवशी.
नऊ दिवस असे मग्न,गरबा खेळण्यात आम्ही.
आई कृपा तुमची सदा राहो आमच्यावरी..
काही चुकले असल्यास क्षमा मागतो आम्ही..
अंबे माता की जय
