नशीब
नशीब
नशीब ज्याचे नावं असते
निवड त्यालां मुळीच नसते
हसावे की रडावे हेही दुसऱ्यानेचं ठरवावे
कां मग जीवन इतरांवरच जगावे
हेच का जीवनाचे ध्येय्य असते
नशीब ज्याचे नावं असते निवड त्यालां मुळीच नसते
कोण आयुष्यातं यावे किंवा रहावे
हेही दुसऱ्यानेचं ठरवावे
हक्क तर नाही पण हट्ट तरी कुणाकडे करावे
पर्याय नसतो तेंव्हा म्हणतात की शेवटी नशीबचं असते
नशीब ज्याचे नावं असते निवड त्यालां मुळीच नसते
वेळ असतो जेंव्हा पण काळ नसतो तेंव्हा
काळ असतो जेंव्हा पण वेळ नसतो तेंव्हा
मग माणसाचे जीवन हे फक्त गोंधळातच फसते
नशीब ज्याचे नावं असते निवड त्यालां मुळीच नसते