STORYMIRROR

Pandit Warade

Tragedy Children

3  

Pandit Warade

Tragedy Children

नशिबात मजुरांच्या

नशिबात मजुरांच्या

1 min
179

नशिबात मजुरांच्या

आली कोठून गरीबी

सुख समृद्धीचे दिस

नाही लिहिले नशिबी

डोई सूर्य नारायण

आग ओकतो, तापतो

लक्षुमीच्या सोबतीने

नारायण का राबतो

माळ रानाची जमीन

बाप मुरूम खणतो

मागे माती भरतांना

जीव मायचा शिणतो

इवल्याशा पोटासाठी

सारा आटापिटा चाले

काम उन्हात करता

हाल लेकराचे झाले

माळरानी गवतात

बाभळीच्या सावलीत

तान्हं लेकरू झोपलं

काळ्या आईच्या कुशीत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy