नर्तकी
नर्तकी
पोटाच्या खळगी पाई,
उडवी नर्तकी ह्दयी रंग.
अंतरीचा भाव दडवून,
नाचण्यात होऊन दंग.
सौंदर्याची करून बरसात,
सप्तसुरांची गाणी गात.
ओंजळीत प्रेम गुंफत,
आनंदाचा सागर हर्षीत.
नाचे नर्तकी बंधने तोडून,
कला अविष्कार करी उधळण.
आयुष्याचा आगळाच खेळ,
शाल मखमली चंदेरी पाघरूण.
तनमन ध्यान नर्तकी ओतून,
पायी घुंगरू छमछम करीत.
रसिक जनांचे करे मनोरंजन,
जगण्याचा जुगार खेळत.
