नमन मायमराठी
नमन मायमराठी
नमन माझे माय मराठीला
वंदून स्मरते सरस्वतीला
समुद्राची शााई भरता
अपुरी पडे थोरवी लिहिता
ग्रंथ ओवी समजण्यास सोपी
धावून आली माय मराठी
आवडीने वाचे भावार्थ गीता
भागवत एकनाथी गाथा
शब्द बदलता अर्थ बदले
अर्थ बदलता भावना बदले
जिकडे वळवा तिकडे वळते
सहज सुलभ भाषा असे
माय मराठीत दडली
माता जन्मभूमी
मातीचा सुगंध दरवळे
सुवासिक भाषेमधून
शस्त्रापेक्षा धार असे
प्रभुत्व तिचे लढाई जिंके
प्रेतालाही चेतना देते
बळ तिच्या शब्दाचे
प्रेतालाही चेतना देते
बळ तीच्या शब्दाचे
