STORYMIRROR

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Inspirational

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Inspirational

नकोशी

नकोशी

1 min
16.4K


नकोशी


बरे झालं आई मी जन्मास येण्यावेळी,

आपले गावं नव्हतं एवढं प्रगत !

'सोनोग्राफी ' नावाचे मशीन,

नव्हतं सहज कोणापाशी उपलब्ध !!!


'ते' असते तर कदाचित मी असते,

का ग ह्या जगात ?


बरे झालं आई आपल्या गावांत,

नव्हती ही प्रथा!

नको असलेल्या मुलींचे नाव,

'नकोशी ' असे ठेवण्याची !!!


'TV' वरच्या बातम्या पाहून,

आज मनात येतं!

असती अशी प्रथा आपल्या गावात,

तर ठेवलं असते का ग माझं नाव 'नकोशी'?


मला खात्री आहें आई ,

नसतेच तुम्हीं माझे नाव 'नकोशी' असे ठेवले !!!

'मुलगी वाचवा, मुलगी शिकवा',

हा नारा तेंव्हा नसताना हि

आम्हाला तू वाचवलेस, चांगले शिक्षण घेण्यास,

सतत प्रयत्न केलास !!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational