STORYMIRROR

Suhas Bokare

Abstract Others

4  

Suhas Bokare

Abstract Others

नजरा

नजरा

1 min
251

नजरांना नित स्वार्थी, मिळणाऱ्या नजरा 

पळ येता गरजेचा, ढळणाऱ्या नजरा


बहुतांशी कळपांच्या, वळणाऱ्या नजरा

डरकाळ्या घुमल्या की, पळणाऱ्या नजरा


मुढबुद्धी भ्रम जूने, मळतांना दिसली 

बस अर्ध्या हळकुंडी, जुळणाऱ्या नजरा!


भ्रम कोऱ्या अधरांचे, निशिगंधी लपले

अन आल्या भ्रमरांच्या, जळणाऱ्या नजरा


दव काचे वरती ते, अन मागे नजरा

दव आहे गळते की , गळणाऱ्या नजरा?


व्यवहारी जग धोका, इतबारे करते 

जग उष्टे सुर गाते, कळणाऱ्या नजरा


जखमांना सहयोगी, मलमांच्या दिसल्या

रगपेशी शिरलेल्या, चळणाऱ्या नजरा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract