STORYMIRROR

Savita Jadhav

Inspirational

3  

Savita Jadhav

Inspirational

निसटलेले क्षण

निसटलेले क्षण

1 min
283

विवाहाच्या पवित्र बंधनी

घेतलेली सात वचने दोघांनी

संसाराचा गाडा हाकला

एकमेकांच्या संगतीनी


घरदार मुलं संसार नातीगोती

निभावून नेल्या जबाबदाऱ्या

मुलाबाळांचे हट्ट पुरवण्यात

मानली धन्यता मागण्या पुरवण्यात साऱ्या


चिमणपाखरांना फुटले पंख

गेली सहजपणे भुर्रकन उडून

आपण आपलं जीवन जगूया

का जावे उगीचच कोलमडून


आपणही थोडं मनासारखं वागू

देऊ एकमेकांना आधार

निसटलेले क्षण सारे नव्यानं जगू

देऊ या मनातल्या कल्पनांना आकार.

💠💠💠💠💠💠💠💠💠💠


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational