निसर्ग
निसर्ग
हिरव्या रानी नभ ओथंबले
बहरली सृष्टी नवंकुराने
नवकांती ल्याली असे धरा
निसर्ग हसतो स्वानंदाने 🌿
आले उतरुनी नभ अंगणी
चाहुल नव चैतन्यमयी
किलबिलाट पशुपक्षंची
मन ,प्रफुल्लित रानोमाळी 🌿
ओझरती झरे प्रितीने
भारावते सृष्टी पावसाने
सरिता प्रितिसागरच्या ओढीने
वाहती आनंदाचे वारे🌿
आगमन श्रावणसरीचे
सजते धरा नववधू जशी
आगमन भाद्रपदा गौरीचे
मंगलदायी अवघी सृष्टी 🌿
🌿🌿💕🌿🌿🌿🌿🌿🌿💕🌿🌿🌿🌿🌿💕🌿🌿🌿
