निश्चयाचा महामेरू
निश्चयाचा महामेरू
तुम्ही वाढविला मान हिंदुंचा
सामना केला मुघलांचा
आदर्श ठेवला राज्यकारभाराचा
शिवनेरी जन्मला शिवबा आमुचा
प्रसंग असो तो आग्य्राचा
वा असो अफजल भेटीचा
कोथला काढला अफजलखानाचा
शक्तिवर विजय होता तो युक्तीचा
स्वराज्यावर जिव होता मावल्यांचा
शाबुत राहिला गड कोंढाण्याचा
तानाजीने विचार नाही केला प्राणाचा
पावन खिंडीत पराक्रम बाजीप्रभुचा
सार्थ ठरविला विश्वास शिवबाचा
गडकिल्ले सांगती इतिहास शिबवाचा
नका करु खच कचरा अन् प्लास्टिकचा
जतन करू वारसा इतिहासाचा
अभिमान असावा पराक्रमाचा
ठेवू आदर्श जाणत्या राज्याचा
बोलबाला होवो महाराष्ट्र किर्तीचा
आठवावा प्रताप शिवबाचा
गर्व नको माज असावा मराठीचा
