निरोप
निरोप
जेंव्हा आपण तरूण होतो, तेंव्हा नव्हता नाॅस्टाल्जिया
आता सारखी गेट टू गेदर ,वाढत्या वयाची ही किमया
भविष्याच्या अज्ञातामधे हाती, भूतकाळाची घट्ट दोरी
तोंड देण्या कशालाही ,गतकाळाचीच तर शिदोरी
माळ तुटता सांडणारे, मोती धरण्याचा खटाटोप
ओघळलेल्या जन्मांना तर ,द्यावाच लागतो ना निरोप!
मुठीत जेवढे उरले क्षण, जगून घेऊ कणन्-कण
रिती होईल ओंजळ जेंव्हा, कसे भेटणार परत आपण?
