STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Drama Romance

3  

शुभांगी कोतवाल

Drama Romance

निराशा

निराशा

2 mins
210


ती होतीच म्हणा तशी सुंदर , सडपातळ,

उंच , गोरीपान , कुरळे केस व चतुर ,


लग्नाच्या वयाची , व लग्न करण्यास इच्छुक, 

मनात आणि डोळ्यात स्वप्न ठेवून वावरणारी

कुणाची उंची कमी तर कोणाचा पगार , 

कुणी मुलगा काही पसंत पडेना तिला 


एके दिवशी अचानक एका उंचपुऱ्या , तेजस्वी 

तरुणावर तिची नजर पडली , ती आनंदली,

बेंगलोर हून आला होता कोणी पाहुणा शेजारी ,


दोघांची नजर मिळाली , ओळख झाली , 

हळूहळू ओळख आता मैत्रीत बदलली ,

तोही होता अविवाहित आणि लग्नासाठी इच्छुक, 


आवडी - निवडी , अनेक विषयांवर चर्चा ,

तिच्या सौंदर्याची स्तुती , मात्र घरच्यांपासून लपून ,

ती होती मराठी , तो होता कर्नाटकी , 


ती होती मात्र त्याच्यावर भाळली, 

मनात होती एक आशा बाळगून , 

त्यालाही ती आवडली असेलच ,

किंवा असेल त्याच्यासाठी फक्त खेळ 


दिवसामागून दिवस उलटले , 

तिला नवीन आशा , स्वप्न देवून गेले , 

त्यानेही तसा केला असेल काहीतरी खुलासा


घरी जाऊन सगळ्यांच्या संमतीने ,

कळवतो म्हणून लवकरच तुला 

असे म्हणून तिचा आत्मविश्वास वाढवून गेला , 


त्याने तिचा हसतहसत निरोप घेतला 

दोघांनी एकमेकांना फोन नंबर दिला , 

पाहुणा घरी पोहोचल्याचा निरोप तेवढा कळला, 


ती मनोमन खुश होती , त्याच्या होकाराची वाट पहात होती , 

नाही फोन , नाही मेसेज, ती मात्र हिरमुसली ,

कोणाला सांगू आणि कसं सांगू कळेना , 


एक दिवस हिम्मत करून फोन लावला ,

नुसतच औपचारिक संभाषण झालं, 

तिच्या मनात आता यायला लागली शंका

नुसती चिडचिड आणि मनाची घालमेल .


चिडून परत तिने फोन केला आणि 

समोरून तो म्हणाला , " लग्न ठरतंय माझं " 

आणि पुढे काही न बोलता , तिने फोन संपवला,

गालांवर अश्रू वाहू लागले , तिला धक्काच बसला ,


त्याच्यासाठी असेल फक्त एक ओळख , मैत्री 

पण तिच्या रोमारोमात तो वसला होता ,

किती स्वप्न पहिली होती तिने , किती आनंदी होती ती 

आणि तो पाहुणा एक निराशा देवून गेला , 

तिचा स्वप्नभंग करून गेला ! 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama