Varsha Shidore

Inspirational


3  

Varsha Shidore

Inspirational


निरागस तिचं मन...

निरागस तिचं मन...

1 min 813 1 min 813

मुलगी माझी असावी 

सर्वांची लाडकी परी... 

वागण्या-बोलण्यात 

संस्कारांची शिदोरी... १


नसली जरी परिपूर्ण 

गुणसंपन्नतेची खाण... 

मनापासून तिने ठेवावा 

थोरामोठ्यांचा मान... २


नसावी अबोल बाहुली 

विचारातून ती बोलकी... 

जपावी तिने निस्वार्थी 

भावनांची आपुलकी... ३


नैतिकतेची ती उपासक 

चौकस असावी सावली... 

विश्वासू कृत्यांतून साकार 

दीनदुबळ्यांची माऊली... ४


परोपकारी माणुसकीचं 

निरागस तिचं काळीज... 

चेहऱ्यावरचं शीतल हास्य 

मनामनात अमर राज... ५


नाही कुणास तिचे निंदने

यातच तिचा बहुमान... 

कर्तृत्वाशी बांधील शान 

माझा वाढे अभिमान... ६


Rate this content
Log in

More marathi poem from Varsha Shidore

Similar marathi poem from Inspirational