STORYMIRROR

Pranjali Kalbende

Abstract

3  

Pranjali Kalbende

Abstract

निळा रंग

निळा रंग

1 min
254

शांत नीरव ढंगात

निळा रंग रंगलेला

अथांगता उरी जरी

सुप्त भाव दडलेला........१


विश्वासाने मनोमनी

उदारता रुतलेली

भव्य काळजात सारे

भव शल्य रूजलेली........२


कल्पनाशक्तीचा जिथे

पूर येई दररोज

भरतीचा ओहोटीचा

खेळ चाले


साहित्यिक व्यासपीठ

कार्यशील सदा ठेवता

लेखणींना प्रोत्साहित

सन्मानपत्राने करता........३


दैनंदिन साहित्य उपक्रम

प्रभावी धाटणीचे

मार्गदर्शन, अभिप्राय

त्याहून उच्च कोटीचे.........४


साहित्य व्रतधारी अश्या

*कवीवर्य पुरूषोत्तम दादास*

मंगलमय सदिच्छा गुच्छ

*काव्यप्रांजू* कडून हा खास....५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract