नीती,प्रेरणा,पालक
नीती,प्रेरणा,पालक
पालक आज असहाय झालाय
आधुनिक तंत्रज्ञानाने नवी पिढी हुशारली
पण मोबाईल, टीव्ही मध्ये हरवली
जवळच्यासाठी वेळ नाही,
दूरच्यासाठी सर्वकाही
आज दुनिया रंगबिरंगी वेशभूषेत
नव्या पिढीला रंगवत आहे
नवनव्या प्रेरणांनी आकर्षित करीत आहे
आज नीतिमत्ता ढासळली आहे
पालकांना मुलांशी बोलण्यासाठी चॅटिंग करावे
मुलांनीही त्यांना चॅटिंगनेच उत्तर द्यावे
कुठे चालला आज आपला बाळ
नाही लागत धरायला आईचे बोट
मोबाईलचा त्याला आधार आहे
बाळ आता "आ" आईला विसरत चाललाय
ओस पडलं आंगण,ओस पडली भातुकली
मोबाईलमध्ये बालके रमली
छोट्या भीमचा लड्डू आकर्षित करतो
दोरेमोन जादुई प्रेरणा देतो
बाळ मात्र वास्तव त्यात विसरतो
हतबल,निराश पालक
आता कसले संस्कार करणार
मोबाईल,टीव्ही मध्ये हरवलेला बाळ
केव्हा आजीची गोष्ट ऐकणार
बाळाचा एक शब्द ऐकण्यास पालक आतूर
बाळ त्याच्या मित्रातच मशगुल
कसा सांधावा मायेचा, प्रेमाचा धागा
नाही घराचे आकर्षण
पाहिजे फक्त दूरदर्शन
बाह्य जगातच बाळ रमला
आई-वडील ,नातेवाईकांना दुरावला
असले कसले हे जादुई जाळे
ज्यामध्ये बाळ आज अडकला
सुटता सुटेना हा विखारी विळखा
मिठी सुटला आईची
मेळ साधला जाईना
नात्यातली तफावत कमी होईना
नात्यात ओलावा येईना------
