STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Inspirational

2  

Abasaheb Mhaske

Inspirational

नेता

नेता

1 min
2.8K


मिळाले तर हारतुरे,

अनं खायला चुरमुरे

नाही तर आहेच, 

मुर्दाबादचे हमखास नारे

पकडला तर चोर ,

साधलं तर मोर

नाही मलाई तर बंडखोर,

अन्यथा आहेच शिरजोर 

आला तर थाट,

नाही तर भुईसपाट

झाला तर सम्राट,

नाही तर कफ्फ्लक बिनबोभाट 

अनिवार खुर्चिचीच आस,

युक्ती शोधी नामी झक्कास

सावज  टिपणारा तळ्याकाठी जणू 

ध्यानस्थ पांढराशुभ्र बगळाच.

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational