नभही पुन्हा दाटुन आले
नभही पुन्हा दाटुन आले


नभही पुन्हा गर्द दाटुन आले
जरी रातभर सर्द बरसून गेले..१
सोबती वारा शिळ मारत झुले..
भावनांचा पिसारा हळूच फुले..२
गुलमोहर केशरी प्रेमाने डुले..
दवबिंदू चमके पानांवर ओले..३
झाडांवर पक्षी चिंब प्रेमात न्हाले..
yle="color: rgb(0, 0, 0);">पिऊनी अमृत चातक तृप्त झाले..४
आल्हाद समयी प्रिय साजना आले..
रोमांच अंगांगी हृदय धड धड हले..५
मऊ गुलाबी गालांवर लाली खुले..
नजरेने हरिणी हृदय घायाळ केले..६
अलगद सरी येऊन धरणीसे मिले..
ये जवळी अशी, मेरे लगजा गले..७