नातं मैत्रीचं
नातं मैत्रीचं
मित्रा .....
तुझं येणं
तुझं जाणं
तुझं असणं
तुझं नसणं
हसणं
दिसणं
सारं सारं काही वेगळंच असतं
एकच ध्यास
एकच भास
सदैव तूच
प्रत्यक्ष तू
स्वप्नात तू
गंध तू
धुंद तू
प्रेम तू
निर्मळ तू
उबदार तू
जाण तू
जाणता तू
जाणीव तू
विश्वास तू
सूर्य तू
पहाट तू
प्रकाश तू
निळेभोर आकाश तू
आठवत तू
खरंच ..,,
आठवणी कधीही येतात कुठंही येतात
तू दाखवलेल्या त्या स्वप्नांच्या ....
खरंच मित्रा....
नातं आपलं शब्दांच्या पलिकडंच
शब्दांत न पकडता येणारं
