नारळाचे झाड
नारळाचे झाड
🌴🌴 🌴🌴
अथांग समुद्रकिनारी
तटस्थपणे उभ असणारं
लाटांसोबत खळखळून हसणारं
नभात विहारणाऱ्या पक्षांना
आपुलकीचं, हक्काचं स्थान
निवारा म्हणून लाभणार
खंबीरपणे उभे राहून
मोठ्या आशेने
आकाशाकडे बघणार
घनगर्द हिरवाई, रंगाची किती अपूर्वाई आपल्याला सांगणार
कधी उन्हातली सावली
तर कधी पावसातली छत्री
वेळप्रसंगी गरिबांसाठी
झोपडी होणारं
थकल्या भागलेल्यांना विसावा तर
तप्त जीवाला हवेचा गारवा देणारं
पृथ्वीवरचा कल्पवृक्ष जणू
खोडा पासून तर फळा पर्यंत
सदैव उपयोगी ठरणारं
आरोग्यसाठी लाभदायक
सौंदर्य शास्त्रात विविध वस्तू
उत्पादन कार्यात मदत करणारं
श्रीफळ म्हणून मान तर
मंगल कार्यात प्रथम स्थान मिळवणार नारळ
अन् नारळाचे झाड
कोकणाची शान असणारं
निसर्गाच्या सौंदर्यात अधिक भर पाडणारं...
