नारीशक्ती
नारीशक्ती
नारी चा अभिमान तू
तूच शक्ती नवदुर्गा तू
गुज सखि मी सांगते
ध्यान चित्ती लाव तू
लाचार दुबळी नाहीस तू
घे हत्तीचेे बळ तू
अंत झाला सहनशक्तीचा
घे शौर्याची तलवार तू
अन्यायाचा कर सामना
कर सत्याची ढाल तू
फित काढ डोळ्यावरची
घे न्यायाचे माप तू
छाटण्या पंख तुझे टपले
पिंंजऱ्यात तुला बंद करू पाहे
विष ओतन्या चहूकडेे
साप फणा काढू पाहे
घारीची नजर ठेव तीक्ष्ण
घे गरुड झेप साप कर भक्ष
