STORYMIRROR

Sanjay Pande

Inspirational

2  

Sanjay Pande

Inspirational

नारीशक्ती

नारीशक्ती

1 min
14.1K


काही वर्षापुर्वी भारतात

नारीने उंबरठा काय ओलांडला

जणू काही समस्त देशावर

संकटाचा पहाडच कोसळला।।

चूल आणि मूल सोडून

चालली कुठे ही आता

असा केला प्रचार यांनी

उंबरठा ओलांडून जाता।।

जरी ओलांडला उंबरठा

चूल आणि मूल नाही सोडले

उंबरठया बाहेर व आत मधील

भूमिकेस समर्थपणे पेलले।।

 या महागाईच्या विश्वात

 आत ठेवणे नसतेच परवरडले

सगळ्याच्या घरातील बजेट 

असते लगेच गड़गड़ले।।

आता कळले आहे सर्वाना

उंबरठा ओलांडणे होते योग्य

समर्थ साथ मिळते नारी ची

हे खरोखर आहे सर्वांचे भाग्य।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational