STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

नारी महाशक्तीशाली

नारी महाशक्तीशाली

1 min
226

रामायणात नारीशक्ती

सीतेने सिद्ध केली

पवित्रता आपुली जगाला

 अग्नीपरीक्षेने दाखविली


पराक्रमी कालीमातेने

आसुरांस ठार मारले

नवरात्रामधी जगदंबेने

घनघोर युद्ध केले


झाशीची राणी पुत्रासवे

घोड्यावर बैसली

वीरश्री अंगी संचारली

शत्रूसेना मारली


आझाद हिंद सेनेमधी

नारीशक्ती प्रबळ

शत्रूसवे लढताना

संचारे अंगी बळ


नारी आजची सैन्यामधी

पराक्रम गाजवते

तिन्ही दलांमधे शत्रूला

नामोहरम करते


नारीशक्तीचे विराट दर्शन

नित्य भूतलावरी

गौरवाया नारीशक्तीला

शब्द अपुरे परि


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract