STORYMIRROR

Pratibha Vibhute

Children

3  

Pratibha Vibhute

Children

नाळ

नाळ

1 min
351

नाळ जुळते गर्भात

जेव्हा बीज अंकुरते

श्वास आईच्या श्वासात 

स्वप्न जन्माचे पाहते...१!


कुस आईची लोभस

अलवार बालपण

प्रेम नाजूक स्पर्शाचा

अनमोल वाटे क्षण...२!


खरे प्रेम या जगात

आई सारखे नसते

ज्यांची दुनिया उजाड

त्यांना त्वरीत कळते...३!


आई वाटे जीव प्राण

सदा जपे स्वाभिमान

पायी मस्तक झुकते

पुण्य मिळे चारधाम...४


तिच्या हृदयात असे

प्रेम अमृत कलश

खरे प्रेम करतांना

मुले होता बघा वश...५!


कधी प्रेमाची तुलना 

कोणा बरोबर नाही

मान्य देवदिकांनी ही

थोर आई विना काही...६!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children